जयश्री बोबाटे (कुनघाडकर) सेट परीक्षा उत्तीर्ण

63

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी, 8 जुलै : गडचिरोली येथील मंगलदास बोबाटे यांची मुलगी व चामोर्शी येथील पत्रकार चंद्रकांत कुनघाडकर यांची पत्नी जयश्री बोबाटे (कुनघाडकर) प्राध्यापक पदासाठी पात्रतेचा निकष असलेल्या महारष्ट्र शासनाच्या सेट परीक्षेत इतिहास विषयात उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2023 रोजी सेट परीक्षा घेतली होती. या परीक्षेत जयश्रीने इतिहास विषय घेऊन परीक्षा दिली. 27 जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार तिने 154 गुण प्राप्त करून भविष्यातील विद्यार्थी घडविण्याच्या मार्ग मोकळा केला आहे.
जयश्रीने आपले दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूल येथे घेतले. राणी दुर्गावती विद्यालय येथे उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतले तर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयातून उत्तम गुणांनी पुर्ण केला असून सध्या ती गोंडवाना विद्यापीठातून इतिहास विषयातून आचार्य पदवी (PHD) पुर्ण करीत आहे. या यशाबद्दल जयश्रीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.