गडचिरोली – चिमूर लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा

63

– घटक पक्ष म्हणून सेनेला संधी देण्माची डॉ. रामकृष्ण मडावी यांची पत्रपरिषदेत मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३ जुलै २०२३ : देशात २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राच्या जागेवर शिवसेनेने (ठाकरे गट) दावा केला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून गडचिरोली -चिमूर क्षेत्राची जागा शिवसेना पक्षाला द्यावी, अशी मागणी आरमोरी क्षेत्राचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी आज स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात मागील दोन टर्ममध्ये भाजपचे खासदार निवडून आले आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये केवळ एकदा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मारोतराव कोवासे हे निवडून आले होते. त्यानंतर कॉंग्रेसने नवा उमेदवार दिल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर या क्षेत्रात भाजपचे खासदार अशोक नेते सातत्याने दोनदा निवडून आले आहेत. आता ही जागा शिवसेनेचा उमेदवार उभा करणार असल्याचे डॉ. रामकृष्ण मडावीराम्कृस्ना यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांच्यासह जिल्हा नियोजन समिती सदस्य कल्पना तिजारे, माजी सरपंच बुधाजी किरमे, विधानसभा संघटक नंदू कुमरे, धानोरा तालुका प्रमुख चंद्रशेखर उईके, आरमोरी तालुका प्रमुख गजानन नैताम, बालाजी बोरकर, सुनील बांगरे, नरेश हिरापुरे, रामदास दहीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.