लॉयड्स मेटल्स कंपनीच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा

41

– कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

एटापल्ली, 21 जून : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स येथील माईन्स निवास येथे आज दिनांक 21जून जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि वाहन चालक असे एकूण 250 लोकांनी सहभागी घेतला. सर्वांना टी शर्ट वाटून योगासने सुरु केले. सर्व योगासणे करून उपस्थितांना फळ, शीत फेय देऊन सांगता करण्यात आले.
योगा म्हणजे काय, योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योग साधना अशा योगाविषयीच्या विविध संकल्पना भारतात पूर्वीपासून प्रचलित आहेत. अध्यात्मिक क्षेत्रात विशेष गती करावयाची असल्यास योगा दृष्टीचा विचार आणि आचार अवलंबला जातो. योगा म्हणजे एकात्मता! एकात्मता, एकता, एकात्मिकता अशा विविध संकल्पना देखील योगाबद्दल सांगता येतील. सर्व सजीवसृष्टी ही एकमेकांशी जोडली गेलेली आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे योगा.

मानवी जीवनाची अत्यंत उच्च स्थिती योग दृष्टीने प्राप्त होऊ शकते. भारतात योगज्ञान अति प्राचीन काळापासून उपलब्ध आहे. अध्यात्मिक प्रक्रियेचा एक विशेष भाग म्हणून योगा या संकल्पनेचा उपयोग केला जातो. योगामध्ये विविध योग सूत्रांचा वापर केला जातो. यम, नियम, प्रत्याहार, ज्ञान, आसन, भक्ती, ध्यान अशा बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत.

योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहीत व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला.

एकूण १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. सविस्तर चर्चेनंतर या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये संपूर्णपणे मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला.

जागतिक योग दिनाचे महत्त्व
मानवी जीवनात शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरांवर योगाने विकास घडवून आणता येतो. त्याचा प्रत्यय जे लोक योगा करतात त्यांना आलेला असतो. असे लोक योगप्रचार करण्यास अत्यंत योग्य व्यक्ती असतात. संपूर्ण जगभरात योगप्रचार झाला तर मानवतेला भारत देश आणि योगा जीवन पद्धती ही सकारात्मक आणि शांततापूर्ण जीवनासाठी सहाय्यक ठरू शकेल.

वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून २१ जून या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होत असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे याच दिवशी योग दिन साजरा होत असल्याने त्याचे भौगोलिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मूल्य वाढते.

संपूर्ण जगभरात या दिवशी योगपूर्ण जीवन पद्धती अंगिकारण्याचे आवाहन केले जाते. जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदी बनवण्यासाठी शरीर व मन योगयुक्त बनवले जाते. त्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व या दिवशी समजावून सांगितले जाते. योग दिनाची माहिती सर्वांना व्हावी व त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी अशा उद्देशाने योग दिनाचे महत्त्व प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र पसरवले जाते. सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करून योग दिनाचे संदेश सर्वत्र पोचवले जातात. जागोजागी मोठमोठे फलक लावले जातात. योगचिकित्सा, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा सर्व बाबींची माहिती सर्वांना व्हावी त्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी योगा व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली जातात.