मोदी सरकारच्या काळात विविध कल्याणकारी योजना अंमलात : खा. अशोक नेते

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. त्यामुळे देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांचा विकास झाल्याची माहिती गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, गडचिरोली क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, आदिवासी आघाडीचे सरचिटणीस प्रकाश गेडाम, माजी शहर अध्यक्ष सुधाकर यनगंदलवार, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, माजी पं. स. उपसभापती विलास दशमुखे, युवा मोर्चाचे चांगदेव फाये, आशीष कोडाप, प्रतिक राठी आदी उपस्थित होते.
पत्रपरिषदेत माहिती देताना खा. अशोक नेते पुढे म्हणाले, देशाला बलशाली करण्याचं मोदीजींचं स्वप्न आहे. त्याकरिताच मोदी सरकारने ९ वर्षांच्या कार्यकाळात विविध योजना अंमलात आणल्या. देशातील प्रत्येक नागरिक सुजलाम सुफलाम झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान मोदी यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे खा. नेते यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छ प्रशासन- सुशासन, डिजिटल इंडियाचा नारा, गरीब कल्याण योजना, अन्नधान्य वाटप, कोरोनाच्या काळात मदतीचा हात अशा विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने सर्वसामान्यांचा आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न केला असल्याचे खा. अशोक नेते यांनी पत्रपरिषदेत सांगितले.