राणी दुर्गावती कन्या विद्यालय गडचिरोलीच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

50

– गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : इयत्ता दहावीच्या परीक्षेत गडचिरोली येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा घवघवीत यश मिळवून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. अश्विनी वामन निमसरकार हिने ९३.४० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर मानसी मुनघाटे व प्रांजली हाडे यांनी ८८.४० टक्के संयुक्तपणे गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला. आमपाली खोब्रागडे हिने ८७ टक्के गुण घेऊन शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या विद्यालयातून एकूण ५७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. प्राविण्य श्रेणीत ९ विद्यार्थिनी तर प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थिनी आणि द्वितीय श्रेणीत २५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आणि ६ विद्यार्थिनी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाल्या.

या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदिवासी सेवक घनश्याम मडावी, विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली मडावी, पर्यवेक्षक ठाकरे, चुऱ्हे, पिल्लारे, धोडरे, कानडी, तांबेकर, लिपीक मांडवगडे, ठेमस्कर, जल्लेवार, सतीश मडावी, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे कौतूक करुन त्यांचे अभिनंदन केले.