सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

70

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी गोंड गोवारी संस्कृती व कल्याण मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखा गडचिरोली, आदिवासी गोवारी समाज संघटना महाराष्ट्र, आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळ भंडारा, आदिवासी गोंड गोवारी विद्यार्थी संघटना जिल्हा गडचिरोली, आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती यवतमाळ/गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध मागण्यांसाठी विदर्भातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी गोंड गोवारी संस्कृती व कल्याण मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष विनायक वाघाडे, कार्याध्यक्ष एम. जी. राऊत, उपाध्यक्ष डॉ. पूर्णानंद नेवारे, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सहसचिव नानाजी दुधकुवर, सचिव धनराज दुधकुवर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नेवारे, राज्याध्यक्ष कैलास राऊत, उपाध्यक्ष कवडुजी सहारे, उपाध्यक्ष वासुदेव मंडलवार, तालुका अध्यक्ष दिगांबर नेवारे, जिल्हा उपाध्यक्ष विजय नेवारे, उपाध्यक्ष नाना ठाकूर, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष राजेश्वर वघारे यांनी केले आहे.