खा. अशोकजी नेते यांनी दर्शविली विविध ठिकाणच्या आंबेडकर जयंती कार्यक्रमात उपस्थिती

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशात आणि राज्यात १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली शहरालगत असलेल्या नविन वस्तीमध्ये वसलेल्या सुंदरनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून उपस्थितांना बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करत नविन वसलेल्या वस्तीतील जनतेशी संवाद साधत तसेच जनतेच्या समस्या जाणून घेऊन याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रामुख्याने खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय व शहरांतील गांधी चौक येथे परमपूज्य, महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वल व पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी अभिवादन करण्यात आले.

या जयंती कार्यक्रमांच्या आयोजन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर न्याय व समानतेसाठी संघर्ष केला. समाजातील दीनदलितांना समानता आणण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आजही लाखो तरुण प्रेरित आहेत. त्यांची शिकवण आणि त्यांचा विचारांचे अनुसरण केल्यामुळे त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, प्रदेश सरचिटणीस एसटी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी सभापती रंजिताताई कोडाप, अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री जनार्दन साखरे, शहराध्यक्षा अर्चनाताई निंबोड, जिल्हा सचिव महिला आघाडीच्या गिताताई हिंगे, जनजाती महिला मोर्चाच्या महामंत्री वर्षाताई शेडमाके, माजी सभापती वैष्णवी नैताम, सुंदराबाई करकाडे, प्रतिभाताई बोरकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, उत्सव समितीचे अध्यक्ष मनिष डोंगरे, माजी उपाध्यक्ष न. प. ॲड. बाळासाहेब आखाडे, माजी नगरसेवक देवाजी लाटकर, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर, प्रा. उराडे, गोवार्धन चव्हाण, अविनाश विश्रोजवार, डेडूजी राऊत, नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, विवेक बैस, श्रीकांत पतरंगे, नितेश खडसे, हर्षलभाऊ गेडाम, दिवाकर गेडाम, रमेश अधिकारी अशोक धोडरे, बंडू सावकार नैताम, आशितोष कोरडे तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.