काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा एड. कविता मोहरकर यांनी घेतली आ. धर्मरावबाबा आत्राम यांची भेट

68

– विविध विषयांंवर केली सविस्तर चर्चा

– माजी जि..प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या नवनियुक्त काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा एडव्होकेट कविता मोहरकर यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची शनिवार 8 एप्रिल रोजी अहेरीच्या राजवाड्यात भेट घेऊन महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी व विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा केली.
विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्रामही उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष बनण्याआधी माझ्या अभिनव कला व सामाजिक कार्याची भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पुढाकाराने ‘दखल’ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सुप्रीमो तथा खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते गड़चिरोलीत सत्कार व सन्मान करून गौरविल्याचे उल्लेख व आठवण करुण एड.कविता मोहोरकर यांनी आनंद व्यक्त केले. आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे दौरे, कार्य आम्हा महिला भगिनींसाठी स्फूर्तिदायक व चेतनादायी असल्याचे मत व्यक्त केले.
प्रामुख्याने एड. कविता मोहरकर यांनी, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सोबत चर्चे दरम्यान महाविकास आघाडी व आम्हा महिलांचे ध्येय-धोरणे अजुन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहून व आम्हा महिलांच्या पाठीशी ख़ंबीरपणे उभे राहिल्यास ‘आगेकुच’ करण्यासाठी आमची ईच्छाशक्ति व भूमिका वाढेल असे म्हणत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यकर्तुत्वाची व नेतृत्वाची गरज असल्याचे एड. कविता मोहरकर यांनी बोलून दाखविले.
यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी एड. कविता मोहरकर यांची नुकतेच गडचिरोली जिल्हा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व पुढील राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा व्यक्त करून कार्याची प्रशंसा करून कौतुक केले.
भेटी व चर्चेदरम्यान सुरेंद्र अलोणे, एड. राजेंद्रप्रसाद मेंगनवार, माजी जिल्हा परिषद सदस्या ममता पेंदाम, एड. करिश्मा भैसारे उपस्थित होते.

एड. कविता मोहरकर विविध पुरस्कारानी सन्मानित
एड. कविता मोहरकर यांनी सन 2011 मध्ये अप्रतिम महावक्ता हा महाराष्ट्र राज्याचा मानाचा पुरस्कार प्राप्त केले आहे. तसेच राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार, सखी अवॉर्ड, सुपर वूमेन अवॉर्ड, पॉवरफुल्ल वूमेन अवॉर्ड, गडचिरोली गौरव पुरस्कार आदी व अन्य विविध पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.
मुख्यतः विधी व न्याय क्षेत्रात उत्कृष्ट अनुभव असून सांस्कृतिक, अभिनव व कला क्षेत्रातही पकड़ आहे. एकंदरीत महिलांच्या प्रश्नाविषयी, सामाजिक व विधायक कार्यात एडव्होकेट कविता मोहरकर सदैव अग्रेसर व तत्पर असतात.. एड.कविता मोहरकर यांनी आजतागायत वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत शेकडोहुन अधिक पुरस्कार पटकाविले आहेत.