गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘बी – फॅशन प्लाझा’ फॅमिली शॉपींग मॉलचा आज भव्य शुभारंभ

46

– सिनेतारका किशोरी शहाणे आज गडचिरोलीत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले गडचिरोली शहरातील ‘बी – फॅशन प्लाझा’ कापड दुकानाने आता कात टाकली आहे. ग्राहकांची सध्याच्या काळातील पसंती लक्षात घेता गडचिरोली शहरातील मूल रोडवर नव्याने उभी केलेल्या भव्य इमारतीत ‘बी – फॅशन प्लाझा’ फॅमिली शॉपींग मॉल उभारला आहे. या शॉपींग मॉलचा भव्य शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज, २२ मार्च २०२३ रोजी सकाळी 11 वााजता होणार आहे. या निमित्ताने प्रसिद्ध सिनेतारका किशोरी शहाणे गडचिरोली शहरात येणार आहेत.


सध्याच्या काळातील ग्राहकांची पसंती लक्षात घेत ‘बी – फॅशन प्लाझा फॅमिली शॉपीींग मॉल’ उभारला आहे. या मॉलमध्ये आता शानदार फॅन्सी कपड्यांचा मोठा खजाना ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. याशिवाय विविध फॅन्सी कपड्यांसोबतच फूट वेयर व कॅस्मेटिक वस्तू वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. या शॉपींग मॉलच्या शुभरंभाला जास्तीत जास्त ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बी – फॅशन प्लाझा परिवार गडचिरोलीतर्फे करण्यात आले आहे.