व्येंकटरावपेठा येथे ११८ जोडपे विवाहबद्ध

110

– आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ कंकडालवार मित्र परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

– सामूहिक विवाह सोहळ्याला हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथे आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र मंडळातर्फे लक्ष्मीदेवी बोनलू व ११८ जोडप्यांंचा एकाच मांडवात सामूहिक लग्न सोहळा पार पडला.

या नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र, डोरले, वधू-वरांना नवे कपड़े, संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडींंना मिष्टान भोजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देण्यात आला. तसेच लग्न सोहळ्याला येणारा सम्पूर्ण खर्च प्रशासनाकडून नव्हे तर कंकडालवार परिवाराकडून करण्यात आलाा. या लग्न सोहळ्यात पंचहत्त्तर टक्के अनु. जमातीचे जोडपे तर उर्वरित अनु.जाती व इतर प्रवर्गतील जोडपे लग्न बंधनात अडकले आहेत.

यावेळी जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह आविसचे नेते श्री. नंदूभाऊ मट्टामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रवींद्रबाबा आत्राम, रियाज शेख, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष कु. रोजा करपेत, उपाध्यक्ष श्री. शैलेश पटवर्धन, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी उपसभापती सौ. गीताताई चालुरकर, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक विलास गलबले, नगरसेविका मीनाताई ओंडरे, जोतीताई सड़मेक, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम, माजी जि. प. सदस्या सुनीता कुसनाके, माजी पंचायत समिती सदस्या सौ. शितल दुर्गे, योगीता मोहूर्ले, छाया पोरतेट, संगीता दुर्वा, इंदारामचे सरपंचा सौ. पेंदाम, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, रेपनपलीचे सरपंचा सौ. लक्ष्मी मडावी, दामरंचा सरपंचा सौ. किरण कोडापे, नागेपलीचे सरपंच श्री. लक्ष्मण कोडापे, उपसरपंच श्री. वैभव कंकडालवार, उपसरपंच श्री. शानगोंडावार, उपसरपंच श्री. हरिष गावडे, माजी सरपंच श्री. गुलाब सोयाम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, माजी उपसरपंच श्री. अशोक येलमुले, माजी उपसरपंच श्री. जगनाथ मडावी, सौ. मीना गर्गम ग्रामपंचायत सदस्य व्येकाटरावपेठा, माजी सरपंचा सुंगधा मडावी, माजी सरपंचा सरोज दुर्गे, माजी सरपंच जे. टी. मडावी, आई माया कंकडालवार, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार आदी मंचावर उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. सदर विवाह सोहळ्याला हज़ारोंच्या संख्येने आदिवासी विद्यार्थी संघाचे व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वऱ्हाडी उपस्थित होते.

यावेळी लग्न सोहळ्याच्या यशस्वीसाठी (नरेश) नरेंद्र गर्गम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, शामराव राऊत, शंकर सिडाम, जि. प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवार, तेजू दुर्गे, प्रमोद कोडापे आदींनी सहकार्य केले. संचालन व आभार प्रदर्शन श्री. प्रज्वल नागूलवार, किशोर दुर्गे, निरंजना वेलादी, शंकर सिडाम, दिलीपजी गर्गम, राजु सिडाम, शामराव राऊत, माधव राऊत, रवी कुळमेथे, महेश दहागावकर, हरिबाबा राऊत, रवी सडमेक, रमेश सोयाम, वसंत गेडाम, राकेश चिंचोलकर, सुरेंद्र गर्गम, महेश कुळमेथ, साई सडमेक बापू आलम, अविनाश गेडाम यांनी केले. यावेळी गावातील समस्त नागरिकांनी सहकार्य केले व हज़ारोंच्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरांना मंगलमय शुभाशीर्वाद दिले.

आगामी काळात मोठा सामूहिक विवाह सोहळा घेणार

सदर लग्न सोहळ्याचे दोन वर्षापूर्वी नियोजन केले होते. मात्र कोरोना संकटामुळे घेता आला नाही. दरवर्षी व्येंकटरावपेठा येथे देवी बोनलू येरमा परिवाराकडून साजरी केली जाते. यावेळी ११ जोडप्यांंचा विवाह करून द्यावे, असे परिवाराकडून ठरले होते. मात्र ११८ जोडपे तयार झाले असून सर्व जाती धर्मांचे जोडपे असून कसलाही भेदभाव केला नसून सर्वांच्या मदतीने सहकार्याने योग्य पद्धतीने विवाह सोहळा पार पडला असून येणाऱ्या काळात यापेक्षा मोठा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येणार असल्याचा विश्वास जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्यक्त केला.