आमदार डॉ. देवरावजी होळी यांची सह्रदयता

43

– अपघातात रस्त्यावर गंभीर जखमी पडून असलेल्या युवकास तत्काळ पोहोचविले रुग्णालयात

– स्वतः रुग्णालयात पोहोचवून जखमी युवकाला तातडीने उपचाराचे दिले निर्देश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट बैठकीला सकाळी ११:३० या नियोजित वेळेवर पोहोचायला निघालेल्या आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना गडचिरोली चामोर्शी महामार्गावर गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या समोरील रस्त्यावर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसला. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तत्काळ आपली गाडी थांबवून त्याला लगेच मदतीचं हात देत त्या गंभीर जखमी झालेल्या २२-२३ वर्षीय तरुण युवकाला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचवून आपली सह्रदयता दाखविली.

अपघात बघितल्यानंतर त्यांनी तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून तयार राहण्यास सांगितले. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तात्काळ त्या युवकाला रुग्णालयात पोहोचविले व त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यावर तातडीने उपचार करायला सांगितले. त्यामुळे तात्काळ त्या गंभीर जखमी युवकावर उपचारही सुरू झालेले आहेत.

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट बैठकीला त्यांना सकाळी ११:३० या नियोजित वेळेवर पोहोचायचे होते. त्या दृष्टीने ते पोहोचणारही होते मात्र अशा प्रकारचा गंभीर अपघात दिसतात त्यांनी ते सर्व बाजूला सोडून जखमीला प्राधान्याने रुग्णालयात पोहोचविण्याचे काम केले त्यानंतरच ते बरोबर १२ वा. गोंडवाना विद्यापीठाच्या बैठकीला पोहोचले.