हरांबा येथील गायत्री महायज्ञात ५३ जणांनी केले रक्तदान

81

– वैनगंगाकाठ ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था व गावकऱ्यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, 9 जानेवारी 2023 : अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा व उमरीच्या वतीने 7 ते 9 जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय 11 कुंडीय गायत्री महायज्ञ, संगीत प्रवचन व दीप महायज्ञाचे आयोजन सावली तालुक्यातील हरांबा येथील जीवन विकास विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या महायज्ञादरम्यान रविवार, 9 जानेवारी रोजी महायज्ञास्थळी वैनगंगाकाठ ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था हरांबाच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 53 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्यात आले.

या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन आयोजकांच्या वतीने कौतुक करण्यात आले. या रक्तदान शिबिर व गायत्री महायज्ञाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा व उमरी तसेच वैनगंगाकाठ ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.