विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३१ डिसेंबर २०२२ : येथील इंदिरानगर वॉर्डात १ जानेवारी २०२३ ला बुध्द विहार बांधकाम पायाभरणीचा समारंभ आयोजित केलेला आहे. इंदिरानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तथागत बौध्द समाज मंडळाच्या जागेवर १ जानेवारीला भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वंदनीय भन्ते बुध्दज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत बुध्द विहार बांधकाम पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन तथागत बौध्द समाज मंडळ इंदिरानगर यांनी केले आहे.