भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांची राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतली सदिच्छा भेट

61

– भाजपा संघटनात्मक विषयांवर केली तब्बल दीड तास चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३० डिसेंबर २०२२ : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी ऊर्जामंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल सदिच्छा भेट घेतली.
भाजपाच्या संघटनात्मक व इतर विषयांवर तब्बल दीड तास चर्चा केली. यावेळी राजेंनी मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना अहेरी येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी लवकरच अहेरी येण्याचे मान्य केले.