जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन

83

– व्यंकटरावपेठा येथील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचं पाणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २९ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील व्येकटरावपेठा येते जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग गडचिरोली अंतर्गत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कार्य काळात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली.असुन सदर विहीर व टाकीच्या भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. व्यंकटरावपेटा येते गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नव्हता. मात्र जि. प. अध्यक्ष यांच्याकडे नवीन विहीर व टाकीसाठी मागणी केली असता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातून निधी मंजूर करण्यात आले असून भूमिपूजन सम्पन्न झाली असून करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येकघरी नळजोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.

या भूमिपूजन कार्यक्रमाला अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ. मिनाताई गर्गम ग्रा. पं. सदस्य, जयाबाई तेलंगे ग्रा. पं. सदस्य, शामराव राऊत माजी उपसरपंच, गुलाबराव सोयाम ग्रा. पं. सदस्य, दिलीप मडावी सरपंच, महेश दहागवकर, रवी सडमेक, विश्वेश्वर पागे, नारायण राऊत, लवखुश आईलवार, करण वनपाकलवार, हरिबाबा राऊत, राजू भोयर, संदीप राऊत. शिपाई ग्रा. पं , शंकर वनपाकलवार, शंकर कांबळे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, नरेंद्र गर्गम, केशव सडमेक, संपत मडावी, सदाशिव राऊत, प्रकाश पेंदाम, डौलत कनाके व गावातील नागरिक उपस्थित होते.