व्यंकटरावपेठा येथील पूलवजा बंधारा बांधकामाचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

87

– स्थानिक शेतकऱ्यांना ये-जा करण्यास सोईस्कर होईल व शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २९ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील ग्रा. पं. व्येंकटरावपेठा येथील धर्मराव शाळेपासू ते नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाला असल्याने पूलवजा बंधारा बांधकामाचे बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडुन 30 लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आले. या पूल वजाबंधारा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा व्येंकाटरावपेठा गावातील शेताकडील नाल्यावार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजय कंकडालवार हस्ते उत्साहात पार पडला.

व्येंकाटरावपेठा येथील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी पावसाळ्यात नाल्यावर पाण्याचा प्रवाह खूप राहत असल्याने शेतकऱ्यांची मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील स्थानिक नागरिकांना व शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतःनाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केले होते.व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत व्यंकटरावपेट नाल्यावार पूलवजा बंधारा बांधकामासाठी जि. प. माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले. जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा येथील जनतेला दिलेल्या ग्वाही पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

अहेरी तालुक्यातील हा तिसरा पूलवजा बंधारा बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.मात्र माजी जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्ष बनले. तेव्हा या नाल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून तिसऱ्यांदा तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे.यापूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

या पुलवजा बंधाऱ्यांचा भूमिपूजन कार्यक्रमला अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ. मिनाताई गर्गम ग्रा. पं. सदस्य, जयाबाई तेलंगे ग्रा. पं. सदस्य, शामराव राऊत, माजी उपसरपंच गुलाबराव सोयाम ग्रा. पं. सदस्य, दिलीप मडावी सरपंच, महेश दहागवकर, रवी सडमेक, विश्वेश्वर पागे, नारायण राऊत, लवखुश आईलवार, करण वनपाकलवार, हरिबाबा राऊत, राजु भोयर, संदीप राऊत. शिपाई ग्रा. पं., शंकर वनपाकलवार, शंकर कांबळे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी, नरेंद्र गर्गम, केशव सडमेक, संपत मडावी, सदाशिव राऊत, प्रकाश पेंदाम, डौलत कनाके, नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.