देवलमारी येथे माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल सामन्याचे बक्षीस वितरण

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २८ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील देवलमारी येथे न्यू स्टार क्रीडा मंडळकडून व्हॉलीबॉल सामान्याचे आयोजन करण्यात आले. या व्हॉलीबॉल सामान्याचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला. या सामान्याचे बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सामान्यातील विजयी संघाना करण्यात आले. देवलमारी येथे आयोजन व्हॉलीबॉल सामान्याचे विजयी संघांना प्रथम पुरस्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत देवलमारी कडून देण्यात आले.

यावेळी उपस्थित माजी सरपंच विजय कुसनाके, महेश लेकुर ग्रा. पं. सदस्य, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, जूलेख शेख, नरेंद्र गर्गम, अक्षय अलेवार, गोपाल लेकुर, शंकर चालुरकर, संजय गोंडे, सुधाकर लेकुर, गणेश गदास्वार, सुधीर बामणकर, रमेश तोकला, वैकुनटम इसंकर, रवी पानेम, व्यंकटेश पानेम, अक्षय सडमेक, मुकेश गांडला, सुधीर बिचाला, अजय मारीन, प्रमोद आत्राम, हरीश गांडला, पोचम गांडला, सत्यराज गौडेवार, सुरेश काटेल व समस्त गावकरी मंडळाचे पदाधिकारी उपास्थित होते.

या व्हॉलीबॉल समान्याचे यशस्वी आयोजनासाठी न्यू स्टार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गणांनी परिश्रम घेतले. उदघाटन व बक्षीस वितरण सोहळ्याला क्रीडाप्रेमीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.