२८ डिसेंबरला गडचिरोलीत ‘गजलसंध्या’ कार्यक्रम

69

– दंडकारण्य शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २५ डिसेंबर २०२२ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बुधवार, २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गजलनवाज भीमराव पांचाळे (bhimrao panchal) यांच्या ‘गजलसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे लाभणार आहेत. भीमराव पांचाळे यांच्या गजल मैफिलीचा आनंद गजल रसिकांनी घ्यावा, असे आवाहन दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले आहे.