कान्होली येथील आहुती नाट्यप्रयोगाचे खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १७ डिसेंबर 2022 : चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथील ‘आहुती’ या सामाजिक नाट्य प्रयोगाचे उद्घाटन खा. श्री. अशोकजी नेते, राष्ट्रीय महामंत्री, भाजपा जनजाती मोर्चा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून आमदार डॉ. देवरावजी होळी होते. दिपप्रज्वलन श्री. प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा महाराष्ट्र यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी खा. श्री. अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, श्री. प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र यांचे भाषणे झालीत. मंचावर श्री. स्वप्नील वरघंटे प्रदेश सदस्य, भाजयुमो महाराष्ट्र, दिलीप चलाख, भाजपा ता. अध्यक्ष चामोर्शी, सुरेश शहा जिल्हा अध्यक्ष बं. आ. गडचिरोली, श्री. राजु पाटील चुधरी, सरपंच नागापुरे, श्री. रेवनाथ कुसराम जिल्हा सरचिटणीस, भाजपा आदिवासी मोर्चा, श्री. संजय खेडेकर.ग्रामपंचायत सदस्य, श्री. कन्नाके सरपंच, श्री. वन्नेवारजी, श्री. चुधरी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.