पीएलजीए सप्ताहात नागरिकांनी केल्या भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधिन

165

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ६ डिसेंबर २०२२ : 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 रोजी होणा­ऱ्या नक्षलवाद्यांच्या (naxal) पीएलजीए (PLGA) सप्ताह दरम्यान पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल (sp nilotpal) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून, उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीतील नागरिकांनी 8 भरमार बंदुका (raifal) व 1 बॅरल पोलिसांंच्या स्वाधीन केल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्रात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवुन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीतील मौजा गट्टेपल्ली, रापल्ले, येरमनार, येरमनार टोला चंद्रा व कुडकेली गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या 8 भरमार बंदुका व 1 बॅरल 5 डिसेंबर 2022 रोजी अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांच्या समक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथे स्वाधिन केल्या. नागरिकांनी स्वेच्छेने त्यांचेकडील बंदुका स्वाधिन केल्यामुळे, बंदुका स्वाधिन करणा­या नागरिकांचा मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. यतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांच्या नेतृत्वात उपपोस्टे पेरमिलीचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि सोनवणे, पोउपनि अजिंंक्य जाधव, नापोशि/ केशव गुरनुले, पोशि/ राहुल खारडे, पोशि/ब्रिाजेश सिडाम, पोशि/ राकेश उरवेते, पोशि/पंकज दंडिकवार, पोशि/सुरज करपेत व उपपोस्टे पेरमिलीचे पोलीस पथकांनी परिश्रम घेतले.