पालिकेने शहरवासीयांना दिलेले अवाढव्य कर नोटीस रद्द करावे

134

– नवीन कर आकारणी नोटिसात दुरुस्ती करण्याची मागणी

– भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १ डिसेंबर २०२२ : नगर परिषद गडचिरोलीने दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी शहरातील नागरिकांना नवीन घर कर (tax) आकारणी बाबतचे नोटीस दिलेले आहे. या नोटीसीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विविध प्रकारचे कर लावून लोकांना अवाजवी कर भरण्यात सांगितले आहे. हे गडचिरोली शहरवासीयांवर प्रचंड अन्याय करणारे असून सदर कर आकारणी नोटीस रद्द करून सर्वसामान्य, गरीब नागरिकांना परवडेल अशी कर रचना करून त्यात दुरुस्ती करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी (bjp) जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भाजपचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनाही जिल्हाधिकाऱ्यांंमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
भाजपाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेने सुधारित कर मूल्यांकनाचे विवरण करताना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणकर, रोजगार हमी उपकर, वृक्ष कर अग्निशमन कर विविध शिक्षण कर, दिवाबत्ती कर, उपयोगिता शुल्क कर असे विविध प्रकारचे जास्त अवाजवी जुलमीकर शहरवासीयांवर लादलेले आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये नगरपालिकेत कोणत्या प्रकारचे शासन नसताना नगरपरिषद प्रशासनाने अशा प्रकारचे निर्णय घेणे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही भारतीय जनता पार्टीचे निवेदनात म्हटले आहे. या नवीन अवाजवी कर आकारणी नोटीसमध्ये जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत नागरिकांमधील असंतोष कमी होणार नाही हे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचा असंतोषचा उद्रेक होण्यापूर्वीच नगरपालिका प्रशासनाने सदर कर रचना आकारणी नोटीस रद्द करावे तसेच विशेष शिक्षण कर, दिवाबत्ती कर, उपयोगिता शुल्क कर इत्यादी कर करयोग्य मुल्यावर लावलेले आहे. त्यामुळे कर वाढलेले आहे सदर कर मालमत्ता करावर लावण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तसेच या मागणीचा गांभीर्याने विचार करून सदर कर आकारणी नोटीस तात्काळ रद्द करण्यात यावे व सर्वसामान्य गरीब कामगार वर्गाला परवडणारे नवीन वाजवी कर आकारून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी भारतीय जनता पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

निवेदन देताना प्रामुख्याने भाजयुमोचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर कुमरे, भाजपचे शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम, शहर सचिव चंद्रशेखर गडसुलवार, गोवर्धन चव्हाण, दलित आघाडीचे शहराध्यक्ष प्राध्यापक अरुण उराडे, श्यामराव वाढई, विजय शेडमाके, सोमेश्वर धकाते, मंगेश रणदिवे, संजय मांडवगडे, रवींद्र निंबोरकर, आनंद सातपुते, भांडेकर व भारतीय जनता पार्टी शहराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.