विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली/ ३० नोव्हेंबर २०२२ : आरोग्य विभागा अंंतर्गत पारडी हॉस्पिटल येथे फार्मसी ऑफिसर पदावर कार्यरत असलेले व गेल्या 25 वर्षांंपासून संस्कृतीक प्रबोधन व निरंतर विविध उपक्रमातून सामाजिक कार्य करीत असलेले श्री. विवेक विरदास मून व सौ. ग्रीष्मा विवेक मून यांना पद्मश्री पोपटराव पवार (popatrao pawar) यांच्या हस्ते पुणे येथे “गडचिरोली भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर सत्कार सोहळा हा पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी ग्लोबल स्कॉलर अकॅडमी पुणे या नामांकित संस्थे मार्फत आयोजित करण्यात आला होता. मून दाम्पत्य हे विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्यात विशेष उल्लेखनीय कार्य करती राहतात. त्याबद्दल पद्मश्री पोपटराव पवार, ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनील बेलगावे व गडचिरोली हितचिंतक मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.