जिल्हा स्टेडियम येथील शिबिरात 35 जणांनी केले रक्तदान

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुस्लिम रहेबर फाऊंडेशन तफे येथील जिल्हा स्टेडियमवर हजरत सैय्यद अहमद जिलानी बाबा यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 35 जणांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अशोक तुमरेटी, जनसंपर्क अधिकारी सतीश ताटकलवार, रक्त संक्रमण तज्ञ प्रफुल राऊत, निलेश सोनवाणे, वसंत नाने, बंडू कुंभारे, भारती चोपकर, शीतल चौधरी, डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजक लकी शेख, मुन्ना होस्मी,अब्बुभाई शेख, इमरान शेख, शारुक शेख, नजमद्दीन खान, मुस्ताक शेख, नईम शेख, शासक पठाण आदींनी सहकार्य केले.