परिस्थीतीला दोष न देता प्रबोधनकारांचा आदर्श जोपासून युवकांनी वाटचाल करावी : अरविंदभाऊ कात्रटवार

83

– प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमातील वृध्दांना जीवनावश्यक साहित्य व कपडे वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. प्रबोधनकार केशव ठाकरे यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी न डगमगता संकटाचा सामना करून हाती कौशल्य असेल तर स्वतला घडविता येते हे प्रबोधनकारांनी आपल्या कर्तुत्वातून दाखवून दिले. प्रबोधनकारांची जीवनगाथा आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून युवकांनी प्रबोधनकारांचा आदर्श जोपासून वाटचाल करावी, असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील वृध्दाश्रमातील निराधार वृध्दांना जीवनावश्यक साहित्य आणि कपडे वितरीत करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. मार्गदर्शन करताना अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, प्रबोधनकारांनी महात्मा फुुले यांना आदर्श मानून समाजकार्यावर भर दिला. बालविवाह, विधवांचे प्रश्न, हुंडाबळी, अस्पृश्यता इत्यादी अनिष्ट रूढींविरुद्ध त्यांनी लेखणीद्वारे जनमत तयार केले. सामाजिक विषमतेवर त्यांनी परखडपणे टीकास्त्र सोडले. ते उत्तम वक्ते होते. आपल्या व्याख्यानातून ते जुन्या रूढींवर टीका करीत. त्यांनी ‘प्रबोधन’ नावाचे नियतकालिक काढून त्यातून सडेतोड लेख लिहिले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रीय लोकांनी ‘प्रबोधनकार’ ही उपाधी दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सहभाग मोठा होता. हक्कासाठी लढणार्‍या संघटनेला ‘शिवसेना’ हे नाव त्यांनीच सुचवले; पुढे त्यांचे पुत्र हिंदु हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवसेना’ निर्माण झाली. हिंदु हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. आज मा. बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाटचाल शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या सुरू आहे. शिवसेनेचा भर पुर्वीपासून समाजकार्यावर आहे. त्यामुळे प्रबोधनकार आणि शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून एक कट्टर शिवसैनिक म्हणून आपल्या हातून समाजसेवेचा वसा जोपासाला जात आहे, असे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. वृध्दाश्रमात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, यादवजी लोहबरे, संदीप भुरसे, विवेक बारसिंगे, अमित बानबाले, नानाजी काळबाधे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, राहुल सोरते, अरुण बारापात्रे, त्रयम्बक फुलझेले, सूरज उइके, निलेश ठाकरे, विनोद मुत्तेमवार, गोपाल मोगरकर, अंबादास मुनघाते, राजू निकुरे, दिलीप चुधरी, फाल्गुन मुळे, निरंजन ठाकरे, तानाजी हतबले, सचिन सलोते, नयन भोयर, दिलीप वालादे, अमित हुलके, प्रशांत ठाकुर, भूषण गुरुकार, सानू साखरे, समीर ठोलने, प्रणय सोरते, गणेश बमनवाड़े, गुरुदेव सलोते, तेजस धंद्रे, अमोल भैसारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.