युवा वर्गांनी मैदानी खेळ खेळावे : खासदार अशोकजी नेते

100

– जूनियर एसीसी क्रिकेट क्लब अंजोराद्वारा आयोजित ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

गोंदिया : अंजोरा तालुका आमगाव येथे ज्युनिअर एसीसी क्रिकेट क्लब ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ व उद्घाटन या क्षेत्राचे खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

खासदार अशोकजी नेते या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले, युवक वर्गांनी मैदानी खेळ खेळावे, खेळामुळे युवकांना जोश व उत्साह,आनंद निर्माण होतो मैदानी खेळाचे आयोजन करणे हे कौतुकास्पद आहे. अशा मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे आहे. अशा या मैदानी खेळामुळे युवकांना जोश, उत्साह, आनंद मिळतो.खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते. त्यामुळे युवकांचा उत्साह (जोश) निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा, जिल्हाध्यक्ष केशवजी मानकर, माजी आमदार संजयजी पुराम, माजी आमदार भैरसिंगजी नागपुरे, कांशिराम हुकरे तालुकाध्यक्ष, नोहरलाल चौधरी उपसभापती, डॉ. गणेश हरिणखेडे माजी उपसभापती, रमेश बहेकार माजी जि.प.सदस्य, सरिता डोये सरपंच, नरेंद्र वाजपेयी महामंत्री, राकेश शेंडे महामंत्री, प्रमोद सावकार संगीडवार सामाजिक कार्यकर्ते, अनिल परसमोडे उपसरपंच, सुभाष तुरकर माजी सरपंच, सरिता मठाले ग्रा. पं. सदस्या, रूचिता बावनथडे ग्रा. पं. सदस्या, माधव कासरपे, बाळकृष्ण पटले ग्रा. पं. सदस्य, तसेच अनेक गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.