समाज उन्नतीसाठी सर्वांंनी एकत्र येणे गरजेचे : अजयभाऊ कंकडालवार

54

– वीर बाबूराव शेडमाके यांच्या पूतडाच्या अनावरण व बिरसा मुंडा जयंती साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील जिम्मलगटा येथेे आदिवासी गोटुल समितीकडून बिरसा मुुंडा जयंती व वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळाच्या अनावरण कार्यक्रम निमित्ताने आदिवासीचे आराध्य देवी देवताचे पूजाअर्चना करण्यात आली.सर्वप्रथम आदिवासी क्रांतीकारी वीर बाबूराव शेडमाके, बिरसा मुुंंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोंगो पूजा करण्यात आले. वीर बाबूराव शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या पालखी घेवून भव्य दिव्य रैली काढण्यात आली व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी उद्घाटन स्थानावरून बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार म्हणाले, आज आपण वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याच्या अनावरण व बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम आपण साजरी करत आहोत. त्यानिमित्तने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून समाजचे उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आदिवासी बांधवाना पेसा कायदा, वनहक्क कायदा, आदिवासीचे रुंढी, परंपरा, जल, जंगल ज़मीन विषय सखोल अशी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री. सोमजी वेलादी सामाजिक कार्यकर्ते, शंकर गावडे भूमका महासंग सचिव व गोंडी प्रचारक आदि होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रियाजभाई शेख, सुरेखा आलाम माजी सभापती अहेरी, कलिक मुख्याध्यापक आश्रमशाळा, डॉ. संतोष नैताम कमलापूर आरोग्य अधीकारी, पंकज तलांडे सरपंच जिमलगट्टा, अजय आत्राम सरपंच बामणी, शांताताई सिडाम सरपंच पेठा, ज्योतीताई मडावी माजी उपसरपंच कोंजेड, सयाम, खडू, पोटे, पेरामा चिंनाजी मिसाल, प्रमोद कोडापे, सलाम भाई, शिवराम व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन श्री. सुंदर नैताम यांनी केले. सायंकाळी भोजन करून आदिवासी सांस्कॄतिक कार्यक्रम घेण्यात आले असून यावेळी परिसरातील ग्रूपनी सहभाग घेतले. यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.