नरभक्षक वाघांच्या बंदोबस्तासाठी शिवसैनिकांचा मोर्चा मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकला !

83

– शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो  शिवसैनिक व नागरिकांचा मोर्चात सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठलेल्या नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसह वनविभागास्तरावर असलेल्या प्रलंबीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात १० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिक व शिवसैनिक सहभागी झाले होते. या मोर्चामुळे प्रशासन हादरले. मोर्चासाठी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात हजारो नागरिक व शिवसैनिक एकवटले. त्यानंतर जय भवानी जय शिवाजी, नरभक्षक वाघाचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा धानोरामार्गे पोटेगाव मार्गावरील मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर नेण्यात आला. शिवसैनिकांच्या घोषणांनी मुख्यवनंरक्षक कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा मुख्यवनंरक्षक कार्यालयावर पोहचल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी रेटून धरली. परंतू मागील दोन वर्षापासून जिल्हयात अनेक वाघ दाखल झाले आहेत. वाघ हिंस्त्र प्राणी असून त्यापासून मानवाला धोका निर्माण होईल व वन्यप्राणी व मानवी संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी शासन व वनविभागाने तातडीने पावले उचलून आवश्यक त्या उपयोजना करणे आवश्यक आहे. परंतू मागील दोन वर्षात वनविभागाच्या वतीने ठोस उपयोजना करण्यात न आल्याने वाघ्रबळीच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. व्याघ्रबळीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक दहशतीत जीवन जगत आहे. वाघाच्या भितीमुळे शेतीकामावर परिणाम झाला आहे. तसेच पाळीव जनावरांच्या चार्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतातील धान पिकाची कापणी व मळणी न झाल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल, हे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी वनविभागाच्या लक्षात आणून दिले. मुख्यवनंसरक्षक यांनी कात्रटवार यांच्याशी चर्चा करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त लवकरच केला जाईल, अशी ग्वाही दिली. शेतीची कामे सोडून शेतकरी मोर्चात सहभागी झाले.
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रासह अमिर्झा परिसरात सध्या धान कापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांची लगबग सुरू आहे. परंतू याच भागात वाघाची सर्वाधीक दहशत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाघाच्या दहशतीच्या परिणाम शेतीच्या कामावर झाला आहे. वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त केलेला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक आपली शेतीची कामे सोडून वाघाच्या बंदोबस्तासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी काढलेल्या मोर्चात मोठया संख्येने सहभागी होऊन वनविभागाचे लक्ष वेधले.

या मागण्या धरल्या रेटून
1) गडचिरोली तालुक्यात वाघ्रळीच्या घटना वारंवार घडत असून मागील दोन वर्षात केवळ गडचिरोली तालुक्यातील २३ नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नरभक्षक वाघाचा तात्काळबंदोबस्त करावा. 2) गडचिरोली तालुक्यात झुडपी जंगल असून या भागातच वाघांचा संचार आहे. तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रील, कळमटोला, भिकारमौशी, धुंडशिवणी तसेच अमिर्झा, दिभना, राजगाटा माल, जेप्रा आदी गावातील नागरिकांना सर्वाधीक धोका निर्माण झाला आहे. सर्वाधीक वाघ्रबळी याच गावातील आहे. त्यामुळे व्यापक त्या उपायोजना कराव्यात. 3) वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाला तातडीने शासनाकडून प्राप्त होणारी आर्थिक मदत देण्यात यावी. 4) वाघाच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे ठार झाली. परंतू अद्यापही पशुपालकांना आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे अनेकांच्या शेतीकामावर आणि दुग्धव्यवसायावर परिणाम झाला असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नुकसाग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. 5) गडचिरोली आणि वडसा वनविभागात अनेक वाघ आहेत. त्यामुळे वाघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी गडचिरोली जिल्हयासाठी कायमस्वरूपी एक स्वतंत्र पथक नेमण्यात यावे. 6) शेतालगत जंगलात वाघांचा संचार असून शेतीकामावर गेलेल्या इसमांवर वाघाने हल्ले केले आहेत. त्यामुळे सिमांकन हद्द निश्चित करून जंगलात संरक्षण कंपाउंड उभारावे. 7) वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामावर परिणाम झाला असून अनेक शेतक्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाघग्रस्त भागातील शेतकर्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्यावी. 8) जंगलात लगत शेत असलेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोलर फेसिंग (सोलर कुंपन) योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्यांंचा समावेश होता.

या मोर्चा प्रसंगी शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, सह संपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकुर, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सचिन निलेकर, मुकेश गुरनुले, सूरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर, ईश्वर लाजुरकर, पूंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानाबा दजगये, नानाजी काळबंधे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, अंबादास मुनघाते, धनेश्वर सुरकर, धानेश्वर फुकेट, सूरज कोलते, निकेश लोहबरे, सूरज शेंडे, विलास देशमुख, सोनू ठाकरे, रविंद्र मिसार, निरंजन लोहबरे, अरुण बरापात्रे, राजू जवाड़े, जगन चापडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोगरकर, रूमान भांडेकर, विलास नैताम, दिलीप वलादे, अमित उईके, कवदुजी धन्द्रे, राहुल मड़ावी, गणेश दहलाकर, यादवजी चौधरी, जविन कुरुड़कर, विनोद लेनगुरे, वैभव तिवाड़े, हेमंत चुधरी, सुनील करतेस, पूर्ण उन्दिरवाडे, मोतीराम चंद्रगिरि, समीर शेख, सचिन भुसारी, मुकेश आवारी, मुरारी धोटे, भूषण गुरुकार, चंद्रभान कोमलवार, निकेश मड़ावी, सचिन स्लोटे, मधुकर बावने, गणेश ब्रमनवाड़े, सूरज उइके, दयाराम चापले, रमेश चनेकर, मुकरु चांग, तुलशिराम मेश्राम, नीलकंठ दुमने, निखिल दिवटे, सचिन जुवारे, पवन हर्षे, प्रशांत ठाकरे, दिलीप लाडे, नादु भैसरे, निरंजन लोहबरे, जगन चापले, रविन्द्र मीरास, त्रयम्बक फुलझेले, राजू निकुरे, संजय गेडाम, उमेश जमभुड़कर, किसान धवले, टेकाम भैसरे, रविंद्र धनफोड़े, संजय करते, राजेन्द्र झरकर, अमित बनबाले, नानजी हतबले, गुरुदेव सूर्यवंशी, महेश मड़ावी, नरेंद्र बुरांडे, चंद्रभान चंदेकर, अजय कंबड़े, चेतन हजारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.