केंद्र सरकारच्या योजनांंचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या पोस्टकार्डाचा खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते शुभारंभ

71

– भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शासकिय विश्रामगृह गडचिरोली येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजने संबंधी भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोलीच्या वतीने विविध योजनेतून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना धन्यवाद! मोदीजी अंत्योदय ते भारत उदय ! या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून सामान्य माणूस सुध्दा केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित राहता कामा नये. जसे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आवास योजना, आयुष्यमान भारत, उज्वला योजना, गरीब कल्याण योजना, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, पिक विमा योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत, अशा विविध लोककल्याणकारी योजने संबंधी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी धन्यवाद! मोदी जी असे पोस्ट कार्डाने पत्र पाठवण्या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले पाहिजे. तसेच केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवून ज्यांनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद म्हणून पोस्टकार्ड पाठविण्यात यावे, असे आव्हान या बैठकीप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, भाजयुमो जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे, भाजयुमो जिल्हा सहप्रभारी अमित गुंडावार यांनी सुध्दा यावेळी विचार मांडले.

या बैठकीदरम्यान नवीन मतदार नोंदणी अभियान, मन कि बात, धन्यवाद मोदीजी, अंत्योदय ते भारत उदय या बैठकीचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले.

या बैठकीप्रसंगी खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लालवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, भाजयुमो जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे, भाजयुमो जिल्हा सहप्रभारी अमित गुंडावार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, जिल्हा महामंत्री भारत बावनथडे, जिल्हा महामंत्री अनिल तिडके, सागर नाकाडे,सागर कुंभारे, दिपक सातपुते, आशिष कोडाप, हर्षल गेडाम, राजु शेरकी, प्रीती शंभरकर युवती प्रमुख, विनोद नागपूरकर, सचिन खरकाटे, संजय मांडवगळे, रामचंद्र वरवाडे, तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.