कृष्णनगर येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

56

– अन्नपूर्णा महिला बचत गट कृष्णनगरच्या संस्थेच्या वतीने धान खरेदीचा शुभारंभ

– खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचण व त्रास होणार नाही याची काळजी घ्या ; खरेदी केंद्राच्या कर्मचाऱ्यांना निर्देश*

– खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अन्नपूर्णा महिला बचतगट कृष्णनगरच्या संस्थेच्या वतीने कृष्णनगर येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून धान खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी डी. एम. ओ. तिवाडे, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, विजय शतलवार, प्रताप ढाली, सत्तू मंडल, सुभाष कुनघाडकर, प्रवाह सरकार, उत्पल बडई, प्रणव बडई, किशोर मल्लिक, उपसंस्कार दासबांधव, किशोर मल्लिक यांचेसह शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचण होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संस्थेच्या कर्मचारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच या खरेदी केंद्रावर आपल्या धानाची विक्री करून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.