कुरखेडा शहरातील आरोग्य निवासस्थानासमोरील राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्तावरील पडलेला खड्डे त्वरित दुरुस्ती करा

60

– भाजयुमो पदाधिकारीची प्रशासनाकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा शहरातून नाक्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आरोग्य विभागाच्या निवासस्थान समोरील रस्त्यावर मोठ्ठा खड्डा पडला असल्यामुळे या रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या रस्तावर अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करुन खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, कुरखेडा नगरपंचायचे नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते जिल्हा सचिव अतुल झोडे, दिगांबर नाकाडे यांनी केली आहे.
या रस्त्यावर मोठ्ठे खड्डे पडले असल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून अनेक दुचाकीस्वाराचे अपघात झाले आहेत. अनेक दिवसांंपासून या रस्त्यावर खड्डा पडला असून सुध्दा या रस्त्यावरील खड्ड्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुलर्क्ष आहे.

या रस्त्याच्या संदर्भात संबधित विभागाने लक्ष देेवून तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देवुन सदर खड्डा बुजण्यात यावा व नागरिकांची समस्या दूर करावी, अशी मागणी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक सागर निरकांरी, अतुल झोडे, दिगांबर नाकाडे व पदाधिकारी यांनी केली आहे.