दीपावली पंचमीच्या निमित्ताने पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस येथे महालक्ष्मीची पूजा

53

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दीपावलीचे औचित्य साधून दि. 29 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता पंचमीच्या शुभ मुहूर्तावर पिपरे पेट्रोलियम सर्विसेस मुल रोड गडचिरोली येथे महालक्ष्मी ची पुजा- अर्चा करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम भाजपचे जिल्हा महामंत्री तथा पेट्रोल पंपाचे मालक मा. श्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते महाराजांच्या उपस्थितीत पेट्रोल पंपावर पूजा- अर्चा करण्यात आली. तसेच यावेळी पेट्रोल व डिझेल च्या सर्व मशीन, जनरेटर, विद्युत पुरवठा करणारे पॉवर स्टेशन इत्यादींची स्वस्तिक काढून पूजा करण्यात आली. व सर्व उपस्थित नातेवाईक, नागरिक, ग्राहक व पंपावरील सर्व कर्मचारी यांनी प्रसाद व तीर्थ देऊन सर्वांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री मा. श्री प्रमोदजी पिपरे यांचे आई- वडील श्री. शंकरराव बालाजी पिपरे व सौ जिजाबाई पिपरे यांच्या आशीर्वादाने व प्रमुख उपस्थितीत लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिपरे पेट्रोलियमचे संचालक अनुराग प्रमोदजी पिपरे, श्री. प्रमोदजी पिपरे यांचे जावई शंकरराव कुनघाडकर, बहीण शैलाताई कुनघाडकर, सुनंदा पिपरे, वेदांत कुनघाडकर, पिपरे पेट्रोलियमचे व्यवस्थापक प्रभाकर वाघाडे व अन्य नातेवाईक, पदाधिकारी, नागरिक व पेट्रोल पंपावरील कर्मचारी उपस्थित होते.