– चिमूर येथे व्यापारी असोसिएशन संघटना व भांगडिया फाउंडेशन परिवारतर्फे दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न
– कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खाजगी व शासकीय वैद्यकीय अधिकारी यांंचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार
विदर्भ क्रांती न्यूज
चिमूर : व्यापारी असोसिएशन संघटना व भांगडिया फाउंडेशन परिवार तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिवाळी स्नेहमिलनाच्या आयोजित कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना खासदार अशोकजी नेते यांनी व्यापाऱी संघटना संबधित येणाऱ्या समस्या,त्यांच्या अडचणी, सोयी सुविधा,त्यांचे प्रश्न,ईमारत, कार्यालय इत्यादी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन,व्यवसायात गुंतलेल्या भांडवलाची मालकी व नियंत्रण यावर त्या व्यवसायाची संघटना अवलंबून असते.व्यवसायाचे स्वरूप, आकार व इतर वैशिष्ट्यपूर्ण बाबी संघटनेवर अवलंबून असते. यासाठी व्यवसाय यशस्वी रीतीने चालविण्यासाठी योग्य अनुरूप अशा व्यापारी संघटनेची गरज असते, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून केले.
तसेच खासदार अशोकजी नेते यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून रेल्वे संबंधित प्रश्न मार्गी निकालात लागत असल्याचे सांगत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आमदार बंटीभाऊ भांगडिया म्हणाले की, चिमुर क्रांती जिल्हा निर्माण करणे हेच माझे उदिष्ट असून चिमूर शहरातील समस्या सोडविण्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगत रेल्वे प्रश्न निकालात लागला असून सर्वेक्षण कार्य सुरू झाल्याचे सांगत येणाऱ्या काळात चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे हेच उदिष्ट असल्याचे सांगितले आणि उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान कोरोना काळात खाजगी व शासकीय वैधकीय अधिकारी यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थान खासदार अशोकजी नेते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार मितेश भांगडिया, आमदार बंटीभाऊ भांगडिया, श्रीकांत भांगडिया, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, डॉ. श्यामजी हटवादे, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, सहकार नेते घनश्याम डुकरे, प्रवीण सातपुते, दीपक उराडे, माजी सभापती प्रकाश वाकडे, बबन बन्सोड, भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी वनकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके गोपाल बलदुवा आदी उपस्थित होते.
संचालन राजु देवतळे तर आभार एकनाथ थुटे यांनी व्यक्त केले. भाजप, भाजयुमो व महिला आघाडी च्या कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून यशस्वी प्रयत्न केले.