ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज

84

– भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांचे प्रतिपादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नाटकाचे आयोजन करण्यात येत असून या ग्रामीण भागातील आयोजित होणाऱ्या नाटकाचे माध्यमातून उत्कृष्ट कलावंत निर्माण होण्याची संधी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कलावंताना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केले.
ते कुरखेडा तालुक्यातील आंधळी (नवरगाव) येथे सर्व गावकरी मंडळी व चंद्रकला शारदा उत्सव महिला मंडळाच्या पुढाकाराने बलीप्रतिपदा व भाऊबीज निमित्ताने संपूर्ण स्त्री संचात “आई मला माफ कर” या नाटकाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रम अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रविंद्रजी गोटेफोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद नागपुरकर तालुका पत्रकार, अप्रव भैसारे उपसरपंच, नानाजी खुणे सदस्य ग्रामपंचायत, हेमंत शेंद्रे व्यवस्थापक आविका, दिगांबर नाकाडे तंंमुस अध्यक्ष, नंदु लांजेवार, मनोज भोंडे, श्रावण भोडे, रामु पाटील खुणे, खुणे सर, दिगाबंरजी खरवडे, मुजुमदार, पल्लवीताई पुसाम, मिनाक्षी डोंगरे, सयामताई जांभुळकर, युवराज खुणे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी रविद्रजी गोटेफोडे, उपसरपंच अप्रव भैसारे, ग्रामपंचायत सदस्य नानाजी खुणे, हेमंत शेंदरे यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन युवराज खुणे यांनी केले. कार्यक्रम यस्ववीतेसाठी सर्व गावकरी मडंळी महिला वर्ग यांनी सहकार्य केले.