कोनसरी प्रकल्प सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आष्टी येथे चक्काजाम आंदोलन

199

– तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोनसरी प्रकल्प सुरू झाल्याशिवाय जिल्ह्यातील सुरजागडचा कच्चा माल परराज्यात किंवा जिल्ह्याबाहेर नेऊ नये प्रकल्प सुरू होईपर्यंत कच्चा माल जिल्ह्यातच साठवून ठेवण्यात यावा, सुरजागड खदाणीत चालणाऱ्या मालगाड्याने प्रवाशांना व स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून ही वाहतूक दिवसाऐवजी रात्री 7 पासून सकाळी 7 पर्यंत सुरू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, 21 ऑक्टोबर रोजी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान चामोर्शी येथील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतिश विधाते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रुपाली पंदिलवार, जिल्हा महासचिव नीलकंठ निखाडे, प्रमोद भगत, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, शामराव चापले, एटापल्ली ता. अध्यक्ष रमेश गंपावर, वामनराव सावसाकडे, संजय पंदिलवार, अनिल कोठारे, निजान पेंदाम, मोहन नामेवार, लोकेश गावडे, वसंत राऊत, दिलीप घोडाम, रमेश यादव मेश्राम, विश्वास बोंमकंटीवार, नितीन खिरटकर, मुन्ना गोंगल, मिलिंद खोब्रागडे, नंदू नरोटे, अब्दुल पंजवाणी, भाग्यवान पिपरे, मिलिंद खोब्रागडे, रमेश चौधरी, पिंकू बावणे, अरुण मडावी, सुभाष कोठारे, विनोद मडावी, गोपाल कवीराज, नितेश राठोड, राबिन पाल, सुवर्णा येमुलवार, रुपेश टिकले, रजनी आत्राम, बाळू कीनेकर, महेश जिलेवार, हरबाजी मोरे, माधुरी कोहळे, कविता भगत, माजिद स्ययद, जावेद खान यांच्यासह हजारोंच्या संख्येने युवक, महिला, शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.