जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात

164

– सेवा समितीचा पुढाकार : कोजागिरी व सत्कारासह विचारांचे आदानप्रदान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जैन कलार समाज सेवा समिती गडचिरोलीच्या वतीने बुधवारी, 12 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर मार्गावरील तिरुपती कॉम्प्लेक्स सभागृहात जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कोजागिरीसह समाजातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच समाज हिताच्या विषयावर विचारांचे आदानप्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश आदमने होते. प्रमुख अतिथी म्हणून भूषण समर्थ, प्रकाश डांगे उपस्थिती होते.
यावेळी समाजातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी राजेंद्र लांजेकर, किशोर भांडारकर, पांडुरंग पेशने, महेश मुरकुटे, रमेश गोटेफोडे, यादव हरडे, मंगला हरडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोरंजनात्मक, उत्साहवर्धक व स्नेहपूर्ण वातावरणात उपस्थित समाजबांधवांनी स्नेहभोजन व रात्री कोजागिरीचा आनंद घेतला. एकमेकांसोबत संवाद साधून कलार समाज हितासाठी समाजबांधवांनी विचारमंथन केले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सतीश आदमने म्हणाले, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे काम करण्याची गरज आहे. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. जैन कलार समाज बचत गट गडचिरोलीचे सचिव मनोज कवठे यांनी बचत गटाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रतन शेंडे यांनी केले. आभार डॉ. उमेश समर्थ यांनी मानले. कार्यक्रमात बचतगटाचे अध्यक्ष प्रदीप रणदिवे, नितीन डवले, प्रदीप लाड, बंडू शनिवारे, सुधीर शेंडे, ॲड. अरुण रणदिवे, कविश्वर बनपूरकर, सुरेश वैरागडे, प्रमोद शेंडे, स्वाती कवठे, सुरेखा रणदिवे, स्नेहा शेंडे, वर्षा शनिवारे, सरिता पेशने, अर्चना मानापुरे, वैशाली लाड, अर्चना भांडारकर, कल्पना लाड, भाग्यश्री शेंडे, डॉ. पियुषा समर्थ, लता मुरकुटे, सुधीर आष्टेकर, गंगाधर हरडे, नलिनी लांजेकर, श्रीधर कवठे, कमल हजारे, कुसुम कावळे, तुकाराम तिडके, सुनील हजारे, रवी समर्थ, सुभाष कावळे आदींसह सुमारे दोनशे जैन कलार समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.