जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ग्रा. पं. मेडपल्ली अंतर्गत गुर्जा (बु.) येथे जि. प. शाळेत नवीन वर्गखोलीचे भूमिपूजन

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत गुर्जा (बु.) येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ४ थे पर्यत शिक्षण असून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्यांंना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि. प. अध्यक्ष मा. श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि. प. अध्यक्ष यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्ग खोली मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले सदर भूमिपूजन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेळपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच श्री. निलेश वेलादी होते. प्रमुख अतिथी यावेळी उपस्तीत पाटाळी पलो, रमेश पुपरेड्डीवार, मारोती देवतळे शिक्षक, विल्सन गावळे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, टिंकू सलम, कार्तिक तोगम, संतोष येनगंट्टीवार, संतोष वसाके तसेच गावातील महिला, पुरुष उपस्थित होते.