जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी केला अतिदुर्गम व अतिसंवेदनाशिल चिटवेली गावात दौरा

44

– रस्ता नसल्याने मोटरसायकलने केला खडतर प्रवास : तलांडी कुटुंबीयांचे सांत्वन व आर्थिक मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनाशिल व आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या चिटवेली गाव दामरंचा वरून १२ कि.मि.अंतरावर वसलेल्या या गावात मात्र स्वांतत्रच्या ७५ वर्षानंतर पण मूलभूत विकास झाला नाही. या गावात अनेक प्रमुख समस्या आवासून उभे आहेत. मात्र प्रमुख समस्या या गावात जाण्यास आजही पक्का रस्ता नसल्याने गेल्या महिन्यात गर्भवती महिलेच्या वाटेतच जिव गेला.चिटवेली गावात १३ कुटुंब वास्तव्यास राहतात. मात्र स्वांतत्र्यच्या होऊन इतकी वर्षे होत आहेत. मात्र या गावाला जाण्यासाठी मुख्य मार्ग नसून जंगलातून पायवाटेने प्रवास करावा लागतो. नागरिकांना अनेक वर्षापासून त्रास सहन करावा लागत असल्याने अनेकदा शासन, प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. चिटवेली येथील झुरी दिलीप तलांडी वय 26 वर्ष हि गर्भवती होती. तिला ट्रॅकटरमध्ये दामरंचा आणत असताना ट्रॅक्टर चिखलात फ़सला. मग बैलबंडीनी आणत असताना वाटेतच जिव सोडावा लागला. त्यानंतर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सदर गावात भेट देवून माहिती घेतल्याचा सांगितले जात आहे. असे कित्येक घटना झाली असतील हे मात्र निश्चितच आहे. दरवेळी निवडणुक आले कि लोकप्रतिनिधी येवून मोठमोठे आश्वासन देत असतात. मात्र सदर रस्त्याच्या समस्याचे निराकरण करण्यास दुर्लक्ष करत आहेत. तरी प्रशासनाकडे मागणी करून रस्त्यांच्या समस्या मार्गी लावून देण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे केले असता सदर समस्या मी आज स्वतः मोटर सायकल घेऊन चिखलातून येताना बघितलो असून खूपच खडतर व जीवघेणा प्रवास आहे. यांबाबत प्रशासनाकडे निवेदन देवून मागणी करण्यात येईल असे सांगितले. तसेच चिटवेली येथील तलांडी कुटुंबाच्या सांत्वन व आर्थिक मदतही केली असून नागरिकांसोबत विविध समस्याबाबत सखोल अशी चर्चा केली. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, दामरंचा ग्रामपंचायतचे सरपंच सौ. किरण कोडापे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सम्मा कुरसाम, अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक श्री. प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच श्री. जिलकरशाह मडावी, प्रमोद कोडापे, भास्कर कोडापे, दिवाकर आलाम, विनोद दूनलावार, पार्वती वेलादी, गंगाराम गावडे, आशिष सड़मेक, बुंजगराव आलाम, कार्तिक आल्लडवार, सतीश चौधरी, आडवे कुरसाम, दिलीप तलांडी, मासा सिडाम, इरया कूड़मेथे, दिवाकर तलांडी आदि होते.