– श्रद्धेय गुरुमाऊली व श्रद्धेय पंडितजींच्या उपस्थितीमध्ये सर्व शिबिरार्थींच्या समवेत शिबिर परिसरात केले वृक्षारोपण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु असलेल्या सेवा पंधरवडानिमित्त माँ भगवती योग निसर्गोपचार अनुसंधान केंद्र गायत्री धाम, सेंधवा मध्य प्रदेश येथील आरोग्य शिबिराच्या समारोपीय दिवशी या परिसरात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे म्हणजेच वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्रद्धेय गुरुमाऊली व श्रद्धेय पंडितजींच्या यांचेसह सर्व शिबिरार्थीं प्रामुख्यानं उपस्थित होते. या केंद्राच्या श्रद्धेय गुरुमाऊली व श्रद्धेय पंडितजींच्या यांच्या आशीर्वाचनात सुरू असलेल्या या शिबिराचा आज समारोपीय दिवस असून शिबिराच्या समारोपीय दिवशी या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वटवृक्ष हे झाड जनकल्याणकारी आहे. थकलेल्या भागलेल्या लोकांना, थंडगार मायेची सावली देणारा तसेच सर्वाधिक ऑक्सीजन देणारा हा वटवृक्ष आहे. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशातील जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करीत असून २०१४ मध्ये त्यांनी लावलेल्या विकासाच्या लहान रोपाचे आज त्यांच्या विशाल कर्तृत्वाने विकासशील वटवृक्षात रूपांतर झालेले आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.