केंद्रीयमंत्री मा. हरदिप सिंग पुरी यांनी बल्लारपूर येथील सफाई कामगार तिलकरामजी यांच्या घरी भोजनाचा घेतला आस्वाद

177

– ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, खा. अशोकजी नेते, हंसराजभैय्या अहिर यांंची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मा. ना. श्री. हरदिप सिंग पुरी केंद्रीय मंत्री पेट्रोलियम, गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री भारत सरकार यांचा लोकसभा प्रवास योजना-२०२४ या निमित्ताने 23 सप्टेंबर रोजी आले असता बल्लारपूर येथील श्री. तिलकरामजी एक दलित समाजातील व्यक्ती सफाई कामगार यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला.

केंद्रीयमंत्री महोदयांसोबत मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार वनेमंत्री, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मा. खा. श्री. अशोकजी नेते,
मा. श्री. हंसराजभैय्या अहिर माजी केंद्रीय मंत्री, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.