खा. अशोक नेते यांनी चामोर्शी नगरपंचायतीच्या विकासासाठी आढावा बैठक आयोजित करावी : नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांची मागणी

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी शहरातील स्मशानभूमी बांधकाम बाबतीत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांची नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी भेट घेतली व चामोर्शी नगरपंंचायतीच्या विकासासाठी आढावा बैठक घेण्याची मागणी केेली. यावर खासदार अशोकजी नेते यांनी लवकरच शहरातील शासकीय जागा नगरपंचायत चामोर्शीला हस्तांतरित केल्यावरच विकासकामे मार्गी लागणार. यासाठी सर्व शासकीय विभागांची तत्काळ आढावा बैठक घेऊन चामोर्शी नगरपंचातीचे सर्व विकासकामे मार्गी लावणार, असे खासदार अशोकजी नेते यांन सांगितले.

येथील भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी चामोर्शी शहरातील विविध विकास कामाबाबत राज्याचे वनमंत्री लोकनेते नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यास यश आले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चामोर्शी शहराच्या विविध नावीन्यपूर्ण विकासासाठी निधीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी
शहराच्या विकासासाठी प्रामुख्याने शहरातील बसस्टँडकरिता निधी, सिटी सर्वे करणे, शहरातील डीपी प्लॅन मंजूर करणे, शहरात सुसज्ज क्रीडांगण, पोलिस स्टेशन समोरील तलावाचे खोलीकरण, गोलीकरण व सौंदर्यीकरण, शहरातील लक्ष्मी गेट चौकातील विस्तारीकरण, स्मशानभूमी निर्मिती, शहरात सुसज्ज वाचनालय तथा अभ्यासिका, शहरात शहिदांचे सुसज्ज स्मारक शहरातील मुख्य नाल्याच्या पाण्याची निक्षेपणाची व्यवस्था मिरची बाजार येथे सुसज्ज बालोद्यान, अद्यावत पाणीपुरवठा योजना, शहरात स्वच्छ मच्छी व मटण मार्केट निर्माण करणे, शहरातील क्रीडांगण विकास
बी. पी. एल. यादीची पुनर्रचना, विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे या विकास कामांना अडचण येत आहे. ही अडचण सोडवण्यासाठी तत्काळ सर्व विभागांची विकासात्मक आढावा बैठक खासदार अशोकजी नेते यांनी आयोजित करण्याचे आश्वासन नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांना दिले. नुकताच भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आयोजित सेवा सप्ताहनिमित्त चामोर्शी येथील कार्यक्रमात नगरसेवक आशिष पिपरे व नगरसेविका सोनाली पिपरे यांनी चामोर्शी शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सविस्तर चर्चा केली.