केंद्र शासनाच्या विविध योजनांंची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवा : खा. अशोकजी नेते

76

– भारतीय जनता पार्टी तथा ओबीसी आघाडी तालुका चामोर्शीच्या वतीने पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवा. मग तो कोणताही नागरिक असो, सामान्य असो, दिन असो, दलित असो, आदिवासी असो, अल्पसंख्यांक असो, प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवून व त्यांना लाभ मिळवून द्या, असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले.

भारतीय जनता पार्टी तथा ओबीसी आघाडी तालुका चामोर्शीच्या वतीने पंंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेेेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. खा. नेते पुढे म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा पंधरवडा कार्यक्रम सेवाभावी म्हणून साजरा करावा. देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असून देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाचे कार्ड वाटप, कृषी संबंधित योजनाचे स्टाल, नगर पंचायत प्रधानमंत्री आवास योजना स्टॉल, कृषी विभाग, तालुका आरोग्य अधिकारी लसीकरण स्टॉल, तहसील कार्यालय रेशनकार्ड, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, महात्मा फुले, इतर मागास वर्गीय, चर्मकार महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळ, आरसेटी बँक ऑफ इंडिया, शेतकऱ्यांसाठी पशुवैद्यकीय माहिती मार्गदर्शन, आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य संबंधित स्टाल,तसेच केंद्र व राज्य सरकार च्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी मा. खा. अशोकजी नेते गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा यांच्यासह प्रदेश सदस्य युवा मोर्चाचे स्वप्निलजी वरघंटे, महिला आघाडीच्या प्रदेशा सदस्या रेखाताई डोळस, भाजपा ओबीसी आ. महामंत्री तथा नगरसेवक आशिषजी पिपरे, नगरसेविका सोनालीताई पिपरे, बँकेचे अधिकारी योगेंद्र बावनकर, आदि. आघाडीचे रेवनाथजी कुसराम, देवाजी धोडरे, प्रीतीताई कातरकर, सोशल मीडिया प्रमुख रमेशजी अधिकारी, आयुष्मान भारत योजनेचे मनोज उराडे, ग्रामीण रुग्णालयाचे नागेश मादेशी, विनोद भाऊ, युवा नेते विनोद किरमे, निखिलभाऊ धोडरे, सतीश भांडेकर तसेच भाजपाचे पदाधिकारी व अनेक महिलावर्ग व युवा कार्यकर्ते, नागरिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.