खा. अशोकजी नेते यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश

98

– वडसा – गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला येणार वेग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांनी रेल्वे संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून सततच्या केलेल्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे. आज, बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.

वडसा (देसाईगंज) -गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग येणार आहे. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिल्याने राज्य सरकारचे खा. अशोकजी नेते यांनी मनापासून आभार मानले आहे.

राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय दसरा- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिलासा देणारा राज्य सरकारचा मोठा गिफ्ट आहे. राज्य सरकार सर्वसामान्य नागरिक जनतेच्या कल्याणासाठी, जनकल्याणासाठी कटीबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया खा. अशोकजी नेते यांनी दिली आहे.