प्रा. अरुण उराडे यांची भाजपा दलित आघाडी गडचिरोली शहर अध्यक्षपदी निवड

159

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची बैठक स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी गोकुलनगर येथील सेवानिवृत्त प्रा. अरुण प्रल्हाद उराडे यांची भारतीय जनता पार्टी दलित आघाडी गडचिरोली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रा. अरुण उराडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉ. देवरावजी होळी, संघटनमंत्री रविंद्र ओल्लारवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, प्रशांत वाघरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांना दिले.
प्रा. उराडे यांची भाजपा दलित आघाडी गडचिरोली शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अनिल तिडके, मधुकर भांडेकर, शहर अध्यक्ष सागर कुंभरे, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, वैष्णवी नैताम, लता लाटकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.