भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन

119

– देशाचे लाडके पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम निमित्ताने रक्तदान शिबिर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली-भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विध्यमाने स्थानिक महिला व बाल रुग्णालय येथे मान. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रम निमित्ताने खा. अशोकजी नेते, डॉ. किलनाके मॅडम यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन करुन रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रकाश गेडाम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, महामंत्री अनिल तिडके, भाजयुमो जिल्हा महामंंत्री मधुकरजी भांडेकर, शहर अध्यक्ष सागर कुंभरे, अनिल कुनघाडकर, हर्षल गेडाम, वर्षाताई शेडमाके, लताताई लाटकर, वैष्णवी नैताम, कविताताई उरकुडे, प्रतिभाताई चौधरी, रश्मीताई बाणमारे, वनमालाताई कन्नाके, आशिष कोडाप, संजय मांडवगडे, मंगेश रणदिवे तसेच भाजपा पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.