विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन ही सामाजिक संस्था नेहमीच युवकांच्या कल्याणाचा विचार करते व युवा कल्याणाकरिता सतत नवनवीन उपक्रम राबवत असते. संस्थेच्या वतीने अभियांत्रिकी शाखेत देशातील नामवंत IIT- NIT- IIIT व GFTI सारख्या संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञांकडून ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार आहे. अभियांत्रिकीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा (Jee Advance) निकाल 11 सप्टेंबरला जाहीर झाला असून त्यासाठी प्रवेश प्रक्रिया 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. “प्रवेश प्रक्रियेचे पूर्ण मार्गदर्शन” ह्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार असून यामध्ये NITआंध्र प्रदेश चे राज कोहळे, सत्यम कुमार दुबे, आयुष कुमार, करण कुमार, हिमांशु रंजन हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी मोठ्या संख्येने देशातील नामवंत अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व अधिक माहिती करिता 7620869761 /9923815724 या नंबर वर संपर्क करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.