अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त भेंडाळा येथे वृक्षारोपण

138

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी जि .प. बांधकाम सभापती गडचिरोली तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचेे अध्यक्ष मा. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त भेंडाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सौ. कुंदाताई जुवारे सरपंच भेंडाळा, उपसरपंच सातपुते भेंडाळा, नरेंद्रभाऊ जुवारे जेष्ठ समाज सेवक भेंडाळा, हरिष गेडाम जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी गडचिरोली, मनोज मंगर जेष्ठ कार्यकर्ते व भेंडाळा येथील नागरिक उपस्थित होते.