पोलीस भरतीकरिता येणाऱ्या उमेदवारांची निवास व भोजनाची व्यवस्था करणार : राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीचा सामाजिक उपक्रम

73

– गडचिरोली शहरापासून पोलीस मुख्यालयापर्यंत उमेदवारांना जाण्याकरिता बससेवेची सुद्धा व्यवस्था

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरात जिल्हा पोलीस भरती 2022 च्या शारीरीक व मैदानी चाचणीस येणाऱ्या जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील उमेदवारांची पावसाळ्याच्या दिवसात गैरसोय टाळण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे उमेदवारांना निवासाची व भोजनाची नि:शुल्क व्यवस्था तसेच शहरापासून पोलीस मुख्यालयापर्यंत उमेदवारांना जाण्याकरिता बससेवेचे नियोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. सदर पोलीस भरती शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक ०६/०९/२०२२ ते ०८/०९/२०२२ पर्यंत आहे. सर्व उमेदवारांना पोलीस कवायत मैदानावर पहाटे ०४:३० वाजता हजर होणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शारीरिक व मैदानी चाचणीस आलेल्या उमेदवार मुलांची निवास व भोजन व्यवस्था पटेल मंगल कार्यालय चंद्रपूर रोड येथे तर उमेदवार मुलींची निवास व भोजन व्यवस्था सुमानंद मंगल कार्यालय आरमोरी रोड गडचिरोली येथे करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना शहरातून पोलीस मुख्यालयात जाण्याकरिता मोफत बसेसची व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली असून या सर्व सामाजिक उपक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष श्रीधर येरावार, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, संजय शिंगाडे, कपील बागडे, योगेश नांदगाये, किशोर बावणे, संकेत जनगणवार, गणेश बावणे, रीतिक डोंगरे, मुझाहीत पठाण, दीपक नंदेश्वर व सर्व राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी योग्य नियोजन करीत आहेत. तरी गरजू उमेदवारांनी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र कुठेही आसरा न घेता नियोजित ठिकाणी केलेल्या निवास व्यवस्थेत विश्रांती घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.