अभाविप व शिक्षण मंचाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा : आ. डॉ. रामदास आंबटकर 

59
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या होऊ घातलेल्या विधीसभा (सिनेट) च्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवरांना विजयी करा, असे आवाहन आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले आहे. ते चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सिनेट निवडणूकच्या निमत्ताने केलेल्या प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
येत्या, 4 सप्टेंबरला गोंडवाना विद्यापीठाची सिनेटची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी आमदार डॉ. आंबटकर गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, वडसा व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपरी, नागभिड, सिंदेवाही, मूल व चंद्रपूर या ठिकाणी प्रवासावर आहेत. या प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी सिनेट निवडणुकीच्या पद्धतीबद्दल व प्रचारासंदर्भात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचे केंद्र ठरू शकते. मागील सिनेटमध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अनेक नवे प्रकल्प विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू केले.  या प्रकल्पांच्या जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी चालना मिळू शकते. विद्यापीठ हे केवळ शिक्षणाचेच माध्यम नसून नवीन संशोधनाच्या माध्यामातूनही विकासासाठी नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे योग्य उमेदवार उमेदवार सिनेटच्या माध्यमातून पोहचणे आवश्यक असल्याने येत्या निवडणुकीत अभाविप व शिक्षण मंचच्या उमेदवारांना मोठ्या सं‘येने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करावे, असेही आवाहन आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत अभाविपचे उमेदवार स्वरुप तारगे, प्रा. धमेंद्र मुनघाटे, शक्ती केराम यासह विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.