आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार

45

– पंचायत समिती गडचिरोलीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गडचिरोली तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले सर्व सत्कारमूर्ती सरपंच व ग्रामसेवकांचे अभिनंदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गडचिरोली तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांच्या सत्काराचा समारंभ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडला. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतरावजी ईचोडकर, उपसभापती विलासजी दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी श्री. साळवे, भाजपा तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य रामरतनजी गोहणे, मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत क्षेत्रामध्ये हर घर तिरंगा या अभियानाचे उत्तम असे नियोजन व यशस्वी आयोजन करून ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांनी या तालुक्याची मान उंचावली आहे. या यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या सत्कारमूर्ती सर्व सरपंच व सचिवांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. सोबतच या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांचेही अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.