बुथवरील प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचा आत्मा : जयंत पाटील

93

– संघटनात्मक आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी साधला थेट संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ३० ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा नीरीक्षक आमदार मनोहर चंद्रीकापूरे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, महिला विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, युवक विभागीय अध्यक्ष नीतीन भटारकर, युवक अध्यक्ष लिलाधर भरडकर हे मंचावर उपस्थीत होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. महिला, युवक, सेवादल, विद्यार्थी इत्यादींच्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. व दर शनिवारी आपआपल्या क्षेत्रात, गावात एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम आवर्जून राबविण्यासाठी सुचना केल्या. तसेच आपल्या पक्षाची सदस्य नोंदणी सुय्‍ आहे. आपल्या जील्ह्यात चांगली नोंदणी व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे. आपले राजकारण बेरेजेचे असल्याचे आपल्या पक्षाची दार सदैव्य येणाऱ्यांसाठी उघडी आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपल्या नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत क्षेत्रात बुथ कमिटी निमिर्तीवरती आवर्जून लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादीत केले. कारण या पक्षाची स्थानिक स्तरावर बुथ कमिटी मजबूत व प्रामाणिक असते. त्या पक्षाला निवडणूकीत अपेक्षीत यश हे प्राप्त होत असतो. म्हणूनच बुथ कमिटीतील प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. तसेच प्रत्येकांनी आपआपल्या भागात प्रयत्न करुन लोकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसविषयी विश्वास निर्माण करा. आपला पक्ष तरुणाचा पक्ष आहे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी धर्मरावबाबा सारख्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आहे. आपण हा जिल्हा राष्ट्रवादीमय करु शकतो, असा विश्वास जयंत पाटील यांनी केला.
जिल्ह्याचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करुन आगामी निवडणुकीत यश संपादन करावे, निवडणुकीतील इच्छूक उमेदवार पक्षाचा ब्रीद राखावे, निवडणूूक आल्यानंतर शिरजोरी करणाऱ्या सदस्यांना कानपिचका देण्यात आल्या. कोण येतो कोण जातो याचा विचार न करता पक्षाला बळकटी कशी मिळेल याचा विचार करायला हवा. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतो. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये पुरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीला राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता धावून गेला. काही लोक सर्व झाल्यानंतर तेथे आले आणि फोटो सेशन करुन गेले, असा टोला आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधकाला लगावला.
पक्षाचे जिल्हा जिल्हा निरीक्षक आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी पक्षाचे ध्येयधोरणे अवलंबून तळागाळातील कार्यकर्त्यांनी कामे करावे. येणाऱ्या दोनही नगर परिषद आपण जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. एकीची वज्रमूठ करा आणि लढा, असे आवाहन आमदार चंद्रीकापूरे यांनी केले.
बैठकीला प्रामुख्याने उपस्थित प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंठे, ज्येष्ठ नेते बबलू हकीम, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, ज्येष्ठ नेते नाना नाकाडे, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, युनुस शेख, जगन्नाथ बोरकुटे, शाम धाईत, संजय साळवे, किशोर तलमले, शैलेश पोटवार, प्रताप गजभिये, अजनु पठाण, अनिल साधवानी, महिला शहर अध्यक्ष मिनल चिमुरकर, तालुका अध्यक्ष नीता बोबाटे, योगेश नांदगाये, संजय कोचे, फहीम काझी, जगन जांभूळकर, राम लांजेवार, संदीप ठाकूर, अनिल लालानी, निकेश नैताम, लवकीक भिवापूरे, सुनील नंदनवार, प्रदीप हजारे, लतीफ शेख, ज्योती सोनकुसरे, ज्योती घुटके, सोनाली पुण्यपवार, संध्या उईके, अनिता कोल्हे, सुवर्णा पवार, जुगनू पटवा, डॉ. तामदेव दुधबळे, पोषक गेडाम, शुभम बनपूरकर, प्रणय बुर्ले, स्वामी चुक्कावार, प्रा. गोसावी, श्रीनीवास विरगोनवार, अमोल मुक्कावार, बुधाजी सिडाम, मुकनूर शेख, अफसर भाई, अरुण मुक्कावार, सुमीत मुतकुरवार, समीर शेख, इम्रान पठाण, चिराग भागडकर, इशांत दहगावकर, राजू नरोटी, मधुकर कुल्लोरी, युध्दीष्टीर बिश्वास, जगदीश रालाबंडीवार, मधन्या मादेशी, किशोर खामनकर, संजय शिंंगाडे, कपील बागडे, नफी पठाण, अमर खंडारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन रायुुुकाँ जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर व आभार राकाँ तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपेश चुधरी, श्रीधर येरावार, अमोल कुळमेथे, प्रसाद पवार, हिमांशू खरवडे, अंकुश झरली, लंकेश सेलोटे, संकेत जनगणवार, चेतन गद्देवार, रंजीम रामटेके आदींनी परिश्रम घेतले.